तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणे

App Store, Apple Music, iCloud, FaceTime, Apple Books, आणि ह्यासारख्या बऱ्याच Apple सेवा ॲक्सेस करण्यासाठी तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करा.

तुम्ही तुमचे Apple डिव्हाइस सेट अप केल्यावर किंवा कोणत्याही वेळी साइन इन करू शकता :

  • iPhone किंवा iPad वर : सेटिंग वर जा, नंतर Apple अकाउंटवर टॅप करा.

  • Mac वर : Apple मेन्यू > सिस्टीम सेटिंग निवडा, नंतर साइडबारमध्ये “तुमच्या Apple अकाउंटने साइन इन करा” वर क्लिक करा.

तुमच्याकडे Apple अकाउंट नसल्यास, तुम्ही ते तयार करू शकता.

तुम्ही तुमचे नाव, छायाचित्र, संपर्क माहिती, पासवर्ड, सुरक्षा सेटिंग आणि पेमेंट व शिपिंग माहिती ह्यांच्या समावेशासह तुमची Apple अकाउंट माहिती बघू आणि बदलू शकता.

तुमची माहिती आणि कॉण्टेंट तुमच्या सर्व डिव्हाइसवर उपलब्ध आहे जिथे एकाच Apple अकाउंटवरून साइन इन केलेले आहे. तुमच्या Apple अकाउंटवर साइन इन करा Apple सपोर्ट लेख पहा.